सहोदरांशी संवाद

सहोदरांशी संवाद
मी सिद्धहस्त लेखक नाही. शिक्षणाने मी सिव्हिल इंजिनीअर आहे आणि पेशाने बिल्डर. डायरी नियमित लिहिण्याची मला गेल्या अनेक वर्षांपासून सवय आहे आणि माझे वडील, आजोबा आणि खापर पणजोबा हे प्रतिभावंत, प्रज्ञावंत होते अशी ‘डीएनए’ तून आलेली पुण्याई आणि डायरी लिहिण्यातून झालेली सवय यामुळे मी लिहिण्याचं साहस करू शकतो.
‘सहोदर’ हा शब्द मला खूप आवडतो. विग्रह केला तर सह + उदर म्हणजे एका उदरातून जन्माला आलेले म्हणजेच भाऊ असा याचा खरं तर अर्थ आहे. पण एका उदरातून जन्माला न येताही आपल्या सारखाच विचार करणारे, एकाच भावनेवर धडकणारे, असं सहकंपायमान अस्तित्व असलेले काही लोक आपल्याला आयुष्यात भेटत असतात. त्यांच्याशी आपली ‘वेव्हलेन्थ’ जुळते असे आपण म्हणत असतो. अशांनाच मी सहोदर समजतो.
जगण्याची, जगाची आणि जीवनाची मला प्रचंड उत्सुकता आहे. जगायला मिळालेल्या प्रत्येक क्षणात आकंठ बुडून तो क्षण जगता यावा याचा मी प्रयत्न करत असतो. घालवलेला ‘क्वालिटी टाइम’ व मिळवलेलं ‘उन्नयन’ हेच प्रत्येक दिवसाचं, वर्षाचं, आयुष्याचं सार्थक मोजण्याचे मापदंड आहेत अशी माझी ठाम धरणा आहे. असं जगण्यात जे काही भावतं, सापडतं ते लिहिण्याचा मी प्रयत्न करत असतो.
या ब्लॉगच्या मार्फत ते आपल्यापर्यंत पोचावं, सहकंपित सहोदरांशी संवाद साधला जावा, या संवादातून एक मैत्रकुळ, सहोदरांचा समूह व्हावा व पुढचं आयुष्य या समूहासोबत शेअर करत करत जगावं हा या ब्लॉगचा उद्देश आहे
ब्लॉग
सहकंपित सहोदरांशी संवाद साधला जावा,
या संवादातून एक मैत्रकुळ, सहोदरांचा समूह व्हावा
व पुढचं आयुष्य या समूहासोबत शेअर करत करत जगावं.

आत्मसंवाद…
प्रत्येक माणूस अगदी आतल्या तळमनात अत्यंत एकटा असतो. तळमनाच्या या पापुद्रयापर्यंत डूब घेणं प्रत्येकजण सहसा टाळत असतो. कारण या एकटेपणाच्या सत्याची जाणीव अत्यंत भयप्रद असते. या सत्याला सामोरं जाणं टाळणं, एकांत टाळणं, सतत इतरांमध्ये राहणं आणि नाईलाजानं आलेल्या एकांतात मन टीव्ही, मोबाइल यांसारख्या कुठल्यातरी साधनांत गुंतवणं असा काही ना काही ‘एस्केप रूट’ सगळेचजण अंगीकारत असतात. आता तर ‘इंटरनेट’, ‘सोशल मीडिया’ सारखी बहिर्मुखतेची अनंत साधनं सहज उपलब्ध झाल्यामुळं या आधुनिक जगात स्वतःशी ‘एन्काऊंटर’ टाळणं आता अधिक सोपं झालेलं आहे.
ग्रीष्मझळा…
ग्रीष्मलळा…
आशुतोष शेवाळकर
संपर्क
Email :
ashutoshshewalkar@gmail.com
माझ्याबद्दल
सिव्हिल इंजिनीयर, बिल्डर. वाचन, संगीत, प्रवास व लेखनाची आवड.
शहर
नागपूर, महाराष्ट्र, भारत.