Skip to content

Blog

ग्रीष्मकळा…

उन्हाळा आता बऱ्यापैकी तापायला लागला आहे. तापणारा उन्हाळा मला फार आवडतो. तसे मला सगळेच ऋतू आवडतात. ऋतुबदलाच्या, नव्या ऋतूच्या चाहुलीच्या काळापासूनच माझ्या मनात त्या ऋतूची ‘उमंग’ येत असते. पण, त्यातल्या त्यात उन्हाळा हा माझ्यासाठी आत्म्याच्या सगळ्यात जवळं घेऊन जाणारा काळ असतो. माझा जन्मच ऐन उन्हाळ्यातला असल्यामुळे कदाचित उन्हाळा मला असा मुळाच्या जवळ घेऊन जात असावा.… Read More »ग्रीष्मकळा…

ग्रीष्मझळा…

रातकिड्यांच्या कीर्र आवाजाची रात्र कधी अनुभवली आहे का? वणी-चंद्रपूर भागात गावाच्या थोडंही बाहेर पडलं की उन्हाळ्याची कडक दुपार पण अशा सन्नाट्याची असते. उन्हाच्या लाहीलाहीमुळे झाडांवरचे रातकिडे दुपारीच कीर्र… किर्र… असा आर्त चित्कार काढायला सुरुवात करतात. पण तरीही हे निरोगी ऊन असतं. विषारी ऊन शहरात असतं. नागपूरातल्या महाल, इतवारी भागातल्या जुन्या २-३ मजली इमारतींमधल्या अरुंद बोळातून… Read More »ग्रीष्मझळा…

ग्रीष्मलळा…

ग्रीष्माच्या कळा आणि झळा कुणाच्या आवडत्या तर कोणाच्या नावडत्या असू शकतात; पण ग्रीष्माच्या लळा लावणाऱ्या काही गोष्टी मात्र सगळ्यांच्याच आवडत्या असाव्यात. उन्हाळ्यात हमखास मिळणाऱ्या सुट्ट्या या तर लहानपणी सगळ्यांच्याच आवडत्या असायच्या. शिक्षण संपल्यापासून आयुष्यातून गेलेल्या या सुट्ट्या मी अजूनही खूप ‘मिस’ करतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या, पाहुणे म्हणून आलेली आते, मामे, चुलत भावंडं, दुपारी रंगलेले पत्ते, कॅरम,… Read More »ग्रीष्मलळा…

आत्मसंवाद…

प्रत्येक माणूस अगदी आतल्या तळमनात अत्यंत एकटा असतो. तळमनाच्या या पापुद्रयापर्यंत डूब घेणं प्रत्येकजण सहसा टाळत असतो. कारण या एकटेपणाच्या सत्याची जाणीव अत्यंत भयप्रद असते. या सत्याला सामोरं जाणं टाळणं, एकांत टाळणं, सतत इतरांमध्ये राहणं आणि नाईलाजानं आलेल्या एकांतात मन टीव्ही, मोबाइल यांसारख्या कुठल्यातरी साधनांत गुंतवणं असा काही ना काही ‘एस्केप रूट’ सगळेचजण अंगीकारत असतात.… Read More »आत्मसंवाद…